अव्वल मानांकित ॲशलेघ बार्ती तीन सेटमध्ये विजयी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 June 2021

अव्वल मानांकित ॲशलेघ बार्तीने एक सेट गमावल्यानंतर कॅर्ला सुवारेझ नवारो हिचा ६-१, ६-७, ६-१ असा पराभव करून विम्बल्डनच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. महिला विभागात व्हिनस विल्म्सनेही ७-४, ४-६, ६-३ असा तीन सेटमध्ये विजय मिळवला.

विम्बल्डन - अव्वल मानांकित ॲशलेघ बार्तीने एक सेट गमावल्यानंतर कॅर्ला सुवारेझ नवारो हिचा ६-१, ६-७, ६-१ असा पराभव करून विम्बल्डनच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. महिला विभागात व्हिनस विल्म्सनेही ७-४, ४-६, ६-३ असा तीन सेटमध्ये विजय मिळवला.

ताकदवान बार्तीने पहिला सेट एकतर्फी जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये मात्र तिला संघर्ष करावा लागला. हा सेट तिने टायब्रेकरवर गमावला. या टायब्रेकरमध्ये बार्तीला अवघा एकच गुण मिळवता आला.

या स्पीडब्रेकरनंतर मात्र बार्तीने पुन्हा भरारी घेत कॅर्लाला प्रतिकाराचीही संधी दिली नाही. 

व्हिनस विल्यम्सने आपल्या पहिल्या फेरीच्या सामन्यात मिहेला बुझारेन्स्कूचे आव्हान ७-५, ४-६, ६-३ असे मोडून काढले. व्हिनस विल्यम्सने ९० व्या ग्रँड स्लॅम स्पर्धेतील सलामीची लढत जिंकताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. दरम्यान, अव्वल मानांकित अॅश्ले बार्तीने हिने तीन सेटच्या लढतीत विजयी सलामी दिली.

तेविसावी विम्बल्डन स्पर्धा खेळणारी व्हिनस ४१ वर्षांची आहे. तिने रुमानियाच्या मिहाएला बुझार्नेस्कू हीला ७-५, ४-६, ६-३ असे पराजित केले. निर्णायक सेटमध्ये ५-१ आघाडीनंतर तीने दोन मॅच पॉइंट दवडले, पण विजय निसटू दिला नाही. जागतिक क्रमवारीत १११ वी असलेली व्हिनसची या वर्षाची ही दहावी लढत आहे.

पुरुषांच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात चौथ्या मानांकित ॲलेझँडर झ्वेरेवने नेदरलँडसच्या तालोन ग्रीसपोरवर ६-३, ६-४, ६-१ अशी मात केली.


​ ​

संबंधित बातम्या