गडहिंग्लजला युनायटेड फुटबॉल स्पर्धेत 'या" अव्वल संघाचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 31 October 2019

साठच्या दशकात अजित किडा मंडळाने ही दिपावली सुट्टीत आंतरराज्य स्पर्धांची परंपरा सुरू केली. महाराष्ट्रा लगतच्या कर्नाटक आणि गोव्याचे संघ या स्पर्धेत सहभागी होत होते. गेल्या १४ वर्षापासून मात्र गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनने ही आंतरराज्य स्पर्धांची संकल्पना अखिल भारतीय स्तरापर्यंत वाढवली.

गडहिंग्लज ( कोल्हापूर ) - येथील युनायटेड फुटबॉल असोसिएशनमार्फत लोकवर्गणीतून होणाऱ्या अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. एम. आर. हायस्कूल मैदानावर मंडपासह लाकडी कठडे उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. उद्या शुक्रवार (ता. १) पासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत केरळ गोकुलम एफ.सी., तमिळनाडूचा चेन्नईन एफसी, गोव्यातील कलंगुट क्‍लब आणि आंध्र प्रदेशचा सिकंदराबाद रेल्वे हे अव्वल संघ आकर्षण आहेत. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असणाऱ्या या स्पर्धेत पाच राज्यांचा सहभाग आहे. युनायटेड ट्रॉफी स्पर्धेचे यंदाचे पंधरावे वर्ष आहे.

साठच्या दशकात अजित किडा मंडळाने ही दिपावली सुट्टीत आंतरराज्य स्पर्धांची परंपरा सुरू केली. महाराष्ट्रा लगतच्या कर्नाटक आणि गोव्याचे संघ या स्पर्धेत सहभागी होत होते. गेल्या १४ वर्षापासून मात्र गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनने ही आंतरराज्य स्पर्धांची संकल्पना अखिल भारतीय स्तरापर्यंत वाढवली.

महाराष्ट्र - कर्नाटक गोव्यासह फुटबॉलमधील बलाढ्य समजल्या जाणाऱ्या केरळ, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश अशा राज्यापर्यंत वाढवली. पुणे एफसी, स्पोर्टिंग गोवा, एसबीटी केरळ, ओनजीसी मुंबई, बीईएमल बेंगलोर, साऊथ युनायटेड, वास्को, एफसी केरला आदी दिग्गज संघ स्पर्धेचे माजी विजेते आहेत. 

आय लिग मधील गोकुलम एफसी हा नामवंत संघ आहे. जागतिक फुटबॉल मधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जुनी स्पर्धा मानली जाणाऱ्या डयुरॅड चषक स्पर्धेचा यंदाचा हा विजेता संघ आहे. तसेच,या संघाने आसाममध्ये गेल्याच महिन्यात झालेल्या दोन अखिल भारतीय स्पर्धांचे अजिंक्‍यपद मिळवले आहे.

चेन्नईन एफसी हा संघ आयएसएलमध्ये खेळतो आहे. चेन्नईन एफसी आयएसएलचा दोन वेळा विजेता आहे.या संघाचा द्वितीय श्रेणी आयलिगमध्ये खेळणारा अठरा वर्षांचा युवा संघ या स्पर्धेत सहभागी होतो आहे.

गोव्याच्या कलंगुट एफसी संघाने यंदाच्या हंगामात बहारदार कामगिरी केली आहे. गोव्याच्या व्यावसायिक फुटबॉलमधील दादा मानल्या जाणाऱ्या स्पोर्टिंग क्‍लब, सेसा अकॅडमी, साळगावकर या संघाला या संघाने गोवा लीगमध्ये गोलशुनय बरोबरीत रोखले आहे. सिकंदराबाद रेल्वे संघ हा अखिल भारतीय आंतर रेल्वे स्पर्धेत माजी विजेता आहे. संतोष ट्रॉफी राष्ट्रीय स्पर्धा खेळलेले १५ खेळाडू या संघात आहेत. 

या संघाबरोबर पुण्याचा लीग विजेता बॉम्बे इंजीनियरिंग ग्रुप (बीईजी), मेंगलोरचा येनीयुपा विद्यापीठ, यवतमाळचा दारवा वलब, बेळगावचा लीग विजेता दर्शन युनायटेड, कोल्हापूरचा खंडोबा तालीम मंडळ या संघाची कसोटी आहे. स्थानिक काळभैरव फुटबॉल क्‍लब ,यजमान गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन, निपाणी फुटबॉल अकॅडमी, सोलापूरचा एसएसएसआय अकादमी,बीड या संघांचा कस लागणार आहे.

मातब्बर संघांची परंपरा
महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या एका टोकाला असणाऱ्या छोट्या केंद्रात लोकवर्गणीतून युनायटेडच्या फुटबॉलच्या विकासाचे प्रयत्न भारतीय फुटबॉलमध्ये कौतुकाचा विषय आहे. मैदानावर बैठक व्यवस्था नसतानाही दहा हजारांहून अधिक शौकीन शिस्तबद्धपणे सामना पाहतात हे आणखी एक वैशिष्ट्य. त्यामुळेच  रेल्वे, विमानतळाची सोय नसतानाही गडहिग्लजकरांच्या फुटबॉल प्रेमाला दाद देण्यासाठी भारतीय फुटबॉल मधील अव्वल समजल्या जाणाऱ्या इंडियन फुटबॉल लिग (आय लिग), इंडियन सुपर लीग(आयएसएल) मधील संघ आपल्या व्यावसायिक अटी बाजूला सारून आवर्जून येतात. यंदाही गोकुलम एफसी आणि चेन्नईन हे संघ महाराष्ट्रात प्रथमच याठिकाणी खेळताहेत.


​ ​

संबंधित बातम्या