'चहल टीव्ही'वर झळकला रिषभ पंत 

वृत्तसंस्था
Saturday, 22 June 2019

या मुलाखतीत रिषभने विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी तयार राहण्याचा "बीसीसीआय'कडून आलेल्या फोनपासून इंग्लंडमध्ये दाखल होण्यापर्यंतचा प्रवास सांगितला आहे. त्याचबरोबर रिषभने 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेच्या आठवणी देखील सांगितल्या आहेत. 

लंडन : विश्‍वकरंडक स्पर्धे दरम्यान भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल याने आपल्या सहकाऱ्यांच्या घेतलेल्या मुलाखती चर्चेचा विषय बनत आहेत.

"बीसीसीआय' "चहल टीव्ही' या अंगतर्ग त्याला आपल्या ट्‌विटर हॅंडलवरून प्रसिद्धी देत आहे. प्रशिक्षक रवी शास्त्री, शिखर धवन, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या यांची आतापर्यंत यात वर्णी लागली आहे. आता चहलने आपल्या नव्या भागात धवनच्या जागी घेण्यात आलेल्या रिषभ पंतची मुलाखत घेतली आहे.

या मुलाखतीत रिषभने विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी तयार राहण्याचा "बीसीसीआय'कडून आलेल्या फोनपासून इंग्लंडमध्ये दाखल होण्यापर्यंतचा प्रवास सांगितला आहे. त्याचबरोबर रिषभने 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेच्या आठवणी देखील सांगितल्या आहेत. 

​ ​

संबंधित बातम्या