हॅपी बर्थडे लिटील मास्टर!

वृत्तसंस्था
Wednesday, 10 July 2019

भारतीय क्रिकेटमध्ये ज्यांनी अनेक विक्रम केले, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत प्रथम दहा हजार धावा करणाऱ्या आपल्या लिटील मास्टर म्हणजेच सुनील गावसकर यांचा वाढदिवस. 

मुबंई : भारतीय क्रिकेटमध्ये ज्यांनी अनेक विक्रम केले, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत प्रथम दहा हजार धावा करणाऱ्या आपल्या लिटील मास्टर म्हणजेच सुनील गावसकर यांचा वाढदिवस. 

त्यांच्या वाढदिवसामुळे सोशल मीडियावरुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. 

गावसकरांबद्दल 5 फॅक्ट्स
1. 1971 मध्ये गावसकरांनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. विंडीजविरुद्ध त्यांनी पहिला सामना खेळला होता.
2. त्यानंतर तीन वर्षांनी ते इंग्लंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळले
3. कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करणारे ते पहिले फलंदाज होते. 
4. 1983 मध्ये सर डॉन ब्रॅडमन यांचा शतकांचा विक्रम त्यांनी मोडला होता.
5. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी 35 शतकं केली.
 


​ ​

संबंधित बातम्या