World Cup 2019 : तो एक थ्रो.. अन् आपण बाहेर!

वृत्तसंस्था
Wednesday, 10 July 2019

न्यूझीलंड गोलंदाजांची अफलातून गोलंदाजी करून 239 धावांची राखण करायची किमया साधून दाखवली. भारतीय फलंदाजीला आव्हान देत गोलंदाजांनी धावा रोखायला नव्हे तर फलंदाजांना बाद करायला मारा केला.  

वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : न्यूझीलंड गोलंदाजांची अफलातून गोलंदाजी करून 239 धावांची राखण करायची किमया साधून दाखवली. भारतीय फलंदाजीला आव्हान देत गोलंदाजांनी धावा रोखायला नव्हे तर फलंदाजांना बाद करायला मारा केला.  

मॅट हेन्रीने पहिल्या स्पेलमधे तीन फलंदाजांना बाद करून दिलेल्या धक्क्यातून भारतीय संघ सावरू शकला नाही. जडेजा (77 धावा) धोनी( 50 धावा) यांनी विक्रमी भागीदारी करूनही भारताचा डाव 221 धावात संपवून न्यूझीलंडने 18 धावांचा विजय संपादताना पाठोपाठच्या विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात धडक मारायची कमाल करून दाखवली. भारतीय संघाचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न सलग दुसर्‍या विश्वचषक स्पर्धेत उपांत्य सामन्यात भंग पावले. 

या सामन्यात झालेल्या पराभवामुळे भारतीय संघावर सोशल मीडियावरुन बरीच टीका करण्यात येत आहे. सध्या सोशल मीडियावर भारतीय संघावर प्रचंड मिम्स निघाले आहेत तर अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. 


​ ​

संबंधित बातम्या