World Cup 2019 : आता बोला.. बाप, बाप होता है; ट्विटरवर धुमाकूळ

वृत्तसंस्था
Sunday, 16 June 2019

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्याला सुरवात झाली ती खूप काँटे की टक्कर होणार असे वाटले होते मात्र, झालं उलटंच. पाकिस्तानच्या संघाची ताकद असलेल्या गोलंदाजीचा भारतीय फलंदाजांनी खरपूस समाचार घेतला. 

वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्याला सुरवात झाली ती खूप काँटे की टक्कर होणार असे वाटले होते मात्र, झालं उलटंच. पाकिस्तानच्या संघाची ताकद असलेल्या गोलंदाजीचा भारतीय फलंदाजांनी खरपूस समाचार घेतला. 

सलामीवीर रोहित शर्माने केलेल्या 140 धावा आणि लोकेश राहुल- विराट कोहलीची अर्धशतके यांच्या जिवावर भारतीय संघाने 46.4 षटकांत 305 धावा केल्या. त्यानंतर पावसाला सुरवात झाली.

पाऊस थांबल्यावर पुन्हा खेळ सुरु झाली आणि कोहली बाद झाला. त्यानंतर भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 337 धावांचे आव्हान ठेवले. ''सारे संघ पाकिस्तानला घाबरतात'' अशी वल्गना करणाऱ्या पाकिस्तानच्या भारतासमोर झालेली दुरावस्था पाहून ट्विटरवर मिम्सने धुमाकूळ घातला आहे.


​ ​

संबंधित बातम्या