बोल्ट माझा विश्वविक्रम मोडू शकला असता : पॉवेल

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 September 2019

लांब उडीत उंच असणे आणि वेगवान असणे नेहमीच फायद्याचे असते. त्यामुळे उसेन बोल्टने लांब उडीत नियमीतपणे भाग घेतला तर त्याने माझा विश्वविक्रम नक्कीच मोडला असता, अशी प्रतिक्रीया विश्वविक्रमवीर आणि जागतिक मैदानी स्पर्धेचे सदीच्छा दूत अमेरिकेचे माईक पॉवेल यांनी दिली.

दोहा : लांब उडीत उंच असणे आणि वेगवान असणे नेहमीच फायद्याचे असते. त्यामुळे उसेन बोल्टने लांब उडीत नियमीतपणे भाग घेतला तर त्याने माझा विश्वविक्रम नक्कीच मोडला असता, अशी प्रतिक्रीया विश्वविक्रमवीर आणि जागतिक मैदानी स्पर्धेचे सदीच्छा दूत अमेरिकेचे माईक पॉवेल यांनी दिली.

पॉवेल यांनी 1991 च्या स्पर्धेत 8.95 मीटर अंतरावर उडी मारून विश्वविक्रम प्रस्थापित केला होता. हा विक्रम अजूनही अबाधित आहे. ते म्हणाले, बोल्ट हा कार्ल ईस, जेसी ओवेन्स आणि माझ्यासारखा उंच आहे, तसेच तो जगातील सर्वात वेगवान धावपटू होता, अशा वेळी त्याने लांब उडीत भाग घेतला असता तर आतापर्यंत माझा विश्वविक्रम मोडित निघाला असता.

मी कार्ल लुईसचा चाहता होतो. तो जे करेल ते तसे मी करीत असे. केवळ लुईसला मात द्यायची या इराद्यामुळेच माझ्याकडून विश्वविक्रम होऊ शकला. आम्हा दोघांमध्ये जबरदस्त स्पर्धा होती, असेही पॉवेल म्हणाले. येथे सुवर्णपदकाचा दावेदार असलेल्या क्युबाच्या जुआन मिगेल इचेवारियाकडून आपला विश्वविक्रम मोडला जाऊ शकतो, असे विचारल्यावर ते हसत म्हणाले, त्याच्यात क्षमता आहे. परंतु त्यास अजून बरीच मजल मारायची आहे.


​ ​

संबंधित बातम्या