विंडीजविरुद्ध कोहली-बुमरा संघाबाहेर

वृत्तसंस्था
Tuesday, 25 June 2019

विश्वकरंडक स्पर्धेनंतर भारतीय संघ ऑगस्टमध्ये वेस्ट इंडीजला मालिका खेळण्यासाठी रवाना होणार आहे. या मालिकेसाठी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि प्रमुख गोलंदाज जसप्रित बुमराला विश्रांती देण्यात आली आहे. 

नवी दिल्ली : विश्वकरंडक स्पर्धेनंतर भारतीय संघ ऑगस्टमध्ये वेस्ट इंडीजला मालिका खेळण्यासाठी रवाना होणार आहे. या मालिकेसाठी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि प्रमुख गोलंदाज जसप्रित बुमराला विश्रांती देण्यात आली आहे. 

एकीकडे विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघ सलग सहा सामने जिंकून यशस्वी कामगिरी करत असताना दुसरीकडे मात्र वेस्ट इंडिज विरोधात होणाऱ्या मालिकेत विराट कोहली आणि बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. येत्या गुरुवारी (27 जून) भारताचा वेस्ट इंडिज विरोधात  सामना होणार आहे. हा सामना जिंकला तर भारताचे उपांत्याफेरीतील स्थान पक्के होणार आहे.

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर भारतीय संघ दोन कसोटी, तीन एक दिवसीय आणि तीन टी20 या 3 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिजला रवाना होणार आहे.  विशेष म्हणजे कसोटी सामन्यांमध्ये विराट आणि बुमराह खेळतील मात्र मर्यादित षटकांच्या सामन्यांत दोघांना विश्रांती देण्यात आली आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असल्यापासून दोघेही सातत्याने खेळत आहेत. त्यांच्यावरील तणावामुळे संघ व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. भारताच्या या दौऱ्यात मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ आणि हनुमा विहारी हे देखील संघात सहभागी होणार आहेत.


​ ​

संबंधित बातम्या