World Cup 2019 : विराटच्या रायुडूला शुभेच्छा; म्हणे तू टॉप होतास 

वृत्तसंस्था
Thursday, 4 July 2019

सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून आकस्मिक निवृत्ती जाहीर केलेल्या अंबाती रायुडूला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने शुभेच्छा दिल्या आहेत. विराटने ट्‌वीटरवर रायुडूसाठी संदेश पोस्ट केला आहे. त्याने विराटने म्हटले आहे की, अंबाती, पुढील वाटचालीसाठी तुला शुभेच्छा. तू टॉपचा खेळाडू होतास. 

वर्ल्ड कप 2019 : लंडन : सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून आकस्मिक निवृत्ती जाहीर केलेल्या अंबाती रायुडूला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने शुभेच्छा दिल्या आहेत. विराटने ट्‌वीटरवर रायुडूसाठी संदेश पोस्ट केला आहे. त्याने विराटने म्हटले आहे की, अंबाती, पुढील वाटचालीसाठी तुला शुभेच्छा. तू टॉपचा खेळाडू होतास. 

विराटने ताकदवान मूठ आणि दोन्ही हातांनी टाळ्या वाजवीत दाद देणे अशा इमोजी पोस्ट केल्या आहेत. 

विराटच्या या ट्‌वीटवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही जणांनी विराटला सवाल केला आहे की, रायुडूला संघात का घेतले नाही, त्याला वर्ल्ड कपपर्यंत पाठिंबा द्यायला हवा होता असे आधी म्हटले होते, मग त्यानुसार वागला का नाहीस.


​ ​

संबंधित बातम्या