Wolrd Cup 2019 : डकवर्थ लुईस नियमानुसार कर्मचाऱ्यांना पगार द्यायचा झाला तर...

वृत्तसंस्था
Wednesday, 10 July 2019

सेहवागने केलेल्या ट्विटमध्ये डकवर्थ लुईस नियमाची फिरकी घेताना लिहिले की, 'पावसाळ्यात कर्मचाऱ्यांना डकवर्थ लुईसकडून पगार दिला गेला तर, किती फायद्याचे ठरेल ना. एचआरचं यावर काय मत आहे?' असा प्रश्न सेहवागने केला आहे.

वर्ल्ड कप 2019
मँचेस्टर :
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे राखीव दिवशी खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 46.1 षटकांत 5 बाद 211 धावा केल्या. त्यानंतर पावसानेच दमदार बॅटींग केली. बराच वेळ वाट पाहूनही पावसाचा जोर कायम राहिल्याने अखेरीस उपांत्य फेरीचा सामना राखीव दिवशी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हणजे आज 46.1 षटकापासूनच सामन्याला सुरुवात होईल. पावसामुळे खेळ वाया गेल्यानंतर भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागनं एक ट्विट केले आहे. 

सेहवागने केलेल्या ट्विटमध्ये डकवर्थ लुईस नियमाची फिरकी घेताना लिहिले की, 'पावसाळ्यात कर्मचाऱ्यांना डकवर्थ लुईसकडून पगार दिला गेला तर, किती फायद्याचे ठरेल ना. एचआरचं यावर काय मत आहे?' असा प्रश्न सेहवागने केला आहे.

​ ​

संबंधित बातम्या