World Cup 2019 : भारताविरुद्ध जिंकायचंय? मग 'हे' करा : वकार युनूस
भारताविरुद्ध लेगस्पिनर शादाब खान याला पाकिस्तानने संधी द्यायला हवी. त्यासाठी शोएब मलिकला वगळावे, असे आग्रही मत माजी कसोटीपटू वकार युनूसने व्यक्त केले.
वर्ल्ड कप 2019 : लंडन : भारताविरुद्ध लेगस्पिनर शादाब खान याला पाकिस्तानने संधी द्यायला हवी. त्यासाठी शोएब मलिकला वगळावे, असे आग्रही मत माजी कसोटीपटू वकार युनूसने व्यक्त केले.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकने चार वेगवान गोलंदाज खेळविताना महंमद हाफिज व शोएब मलिक यांचा "पार्टटाइम' फिरकी मारा वापरला होता, पण ते डावपेच फसले होते. त्या दोघांच्या 11 षटकांत 86 धावा गेल्या होत्या. मलिकच्या 4 षटकांत 26, तर हाफिजच्या 7 षटकांत 60 धावा गेल्या होत्या. हाफिज एकच विकेट मिळवू शकला. शादाबला इंग्लंडविरुद्ध खेळविण्यात आले होते. त्याने जॅसन रॉय आणि शतकवीर ज्यो रूट यांना बाद केले होते. तो सामना जिंकून पाकने पहिला विजय मिळविला होता.
वकार म्हणाला की, "पाकने चार वेगवान आणि शादाब असे पाच गोलंदाज खेळविले पाहिजेत.''
"ए प्लस' दर्जाचा खेळ हवा
रविवारी भारताविरुद्ध पाकला उच्चतम खेळ करण्याशिवाय गत्यंतर नसेल असेही वकारने सांगितले. तो म्हणाला की, "भारताविरुद्ध पाकिस्तान खेळतो तेव्हा तो सामना महत्त्वाचा असतो. या वेळची लढत पूर्वीपेक्षाही जास्त महत्त्वाची असेल, याचे कारण सोपे आहे. पाकला स्पर्धेत राहायचे असेल तर "ए प्लस' दर्जाचा खेळ करावा लागेल आणि जिंकावे लागेल.'
लवकर विकेट महत्त्वाच्या
कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताच्या बलाढ्य फलंदाजीविरुद्ध लवकर विकेट मिळविण्याची आवश्यकता असल्याचेही वकार म्हणाला. "या स्पर्धेत आतापर्यंत जे दिसून आले आहे ते पाहिले तर लवकर विकेट मिळविल्या नाहीत तर तुम्ही अडचणीत येता. नव्या चेंडूवरील मारा महत्त्वाचा असेल. या वेळी पहिल्या दहा षटकांत सलामीचे फलंदाज काळजीपूर्वक खेळ करीत आहेत. टॉंटनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही बाबतीत पाक संघ नव्या चेंडूवरच कमी पडला