World Cup 2019 : पठाण सटकला; मॉर्गनला धावच काढू देईना

वृत्तसंस्था
Wednesday, 19 June 2019

इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात सुसाट सुटलेल्या इंग्लंडचा कर्णधार इयॉन मार्गनला कसे थांबवावे हे अफगाणिस्तानच्या खेळाडूंना सुचत नव्हते. अशावेळी कर्णधार गुलबदीन नैब पुढे सरसावला मात्र, त्याने अत्यंत हास्यास्पद आणि चुकीच्या पद्घतीने थांबवून बाद करण्याचा प्रयत्न केला. 

वर्ल्ड कप 2019 : लंडन : इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात सुसाट सुटलेल्या इंग्लंडचा कर्णधार इयॉन मार्गनला कसे थांबवावे हे अफगाणिस्तानच्या खेळाडूंना सुचत नव्हते. अशावेळी कर्णधार गुलबदीन नैब पुढे सरसावला मात्र, त्याने अत्यंत हास्यास्पद आणि चुकीच्या पद्घतीने मॉर्गनला थांबवून बाद करण्याचा प्रयत्न केला. 

मॉर्गनने संथ सुरवात करत 36 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकाविले. मात्र, त्यानंतर त्याने पुढील केवळ 21 चेंडूंमध्ये 50 धावा केल्या. मात्र, नैबने त्याला बाद करण्यासाठी त्याला अडविले. 

सामनाच्या 32व्या षटकात हा किस्सा घडला. मॉर्गन ज्यो रुटने धाव नाकारल्यावर पुन्हा क्रिझमध्ये परतत असताना नैबने त्याला धरुन ठेवण्याचा प्रयत्न केला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.     


​ ​

संबंधित बातम्या