World Cup 2019 : हात जोडतो रे विराट प्लिज आऊट हो

वृत्तसंस्था
Tuesday, 18 June 2019

सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडिओ समोर येत आहेत. अशातच इमाद वसिम कोहलीला हात जोडून बाद होण्याची विनंती करत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 

वर्ल्ड कप 2019 : लंडन : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला आता 24 तासाहून जास्त काळ उलटून गेला असला तरी त्यावरील चर्चा काही थांबलेली दिसत नाही. सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडिओ समोर येत आहेत. अशातच इमाद वसिम कोहलीला हात जोडून बाद होण्याची विनंती करत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 

रविवारी झालेल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी पाकच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पाकचा अष्टपैलू इमाद वसिम कोहलीला हात जोडून बाद होण्याची विनंती करत होता आणि तो व्हिडिओ आता तुफान व्हायरल होत आहे. 

दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 89 धवांनी विजय मिळविला. त्यानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानच्या संघाला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.


​ ​

संबंधित बातम्या