World Cup 2019 : भारत-पाक सामन्याची स्वप्न पाहताय? थांबा, पाऊसच करेल बॅटींग
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील लढत पावसामुळे वाया गेली असतानाच चाहत्यांचे लक्ष रविवारच्या भारत-पाक लढतीकडे लागले आहे. तेथील हवामानात सुधारणा होईल, असा अंदाज असला तरी काळे ढग अद्याप घोंघावतच आहेत.
वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील लढत पावसामुळे वाया गेली असतानाच चाहत्यांचे लक्ष रविवारच्या भारत-पाक लढतीकडे लागले आहे. तेथील हवामानात सुधारणा होईल, असा अंदाज असला तरी काळे ढग अद्याप घोंघावतच आहेत.
आठवडाभराच्या पावसानंतर वीकेंडला हवामानात बदल होईल. रविवारी सूर्यदर्शन होईल. हवामान आल्हाददायक असेल. तपमान 17 ते 18 अंश असेल, पण त्याचवेळी अधूमधून सरी होतील आणि काही सरी जोरदार असतील, असे ब्रिटीश हवामान खात्याच्या आधिकाऱ्यांनी सांगितल्याचे वृत्त आहे.
ऍक्यूवेदरने रविवारी दिवसभर ढगाळ हवामान असेल असे म्हटले आहे, तर बीबीसीने रविवारी पावसाची शक्यता नाही, असा दावा केला आहे. मात्र, ब्रिटनमधील क्रिकेट रसिक येथील हवामान कधीही बदलू शकते असा इशारा देत आहेत. ऍक्यूवेदरने रविवारी केलेल्या अंदाजानुसार दोन्ही डाव सुरू होण्याच्या सुमारास पावसाची शक्यता असेल असे सांगितले आहे; तर लढतीच्या अंतिम टप्प्यात खूपच ढगाळलेले वातावरण असेल असे म्हटले आहे. वेदर डॉट कॉमने पावसाची शक्यता पन्नास टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला आहे