टी20 वर्ल्ड कप जिंकून दिले तेच पुन्हा विंडीजचे कोच

वृत्तसंस्था
Tuesday, 15 October 2019

ब्रिजटाऊन, बार्बाडोस - वेस्ट इंडीज क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा माजी सलामीवीर फिल सिमन्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याशी चार वर्षांचा करार झाल्याची घोषणा विंडीज क्रिकेट मंडळाने केली.

वन-डे विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर सिमन्स यांनी अफगाणिस्तानचे मुख्य प्रशिक्षकपद सोडले. सिमन्स हे हंगामी प्रशिक्षक फ्लॉईड रिफर यांच्याकडून सूत्रे स्वीकारतील.

सिमन्स यांच्याकडे दुसऱ्यांदा ही सूत्रे येत आहेत. आधी 2015च्या विश्‍वकरंडकानंतर त्यांची नियुक्ती झाली होती. त्या वेळी निवड समितीला जाब विचारल्याच्या कारणावरून त्यांना निलंबित करण्यात आले होते.

2016 मध्ये त्यांना पाचारण करण्यात आले. त्या वेळी भारतात त्यांनी विंडीजला टी-20 जगज्जेतेपद जिंकून देत ऐतिहासिक कामगिरीत मोलाचा वाटा उचलला. त्यानंतर त्यांना बडतर्फ करण्यात आले. माफी आणि आर्थिक तडजोडीनंतर त्यांची "इनिंग' संपली. 

विंडीज मंडळाचे अध्यक्ष रिकी स्केरीट यांनी सांगितले की, सिमन्स यांना परत आणण्यामागे भूतकाळातील चुका दुरुस्त करण्याचा उद्देश आहेच. याशिवाय आम्ही योग्य वेळी योग्य व्यक्तीची निवड केल्याचा विश्‍वासही वाटतो. रिफर यांनी हंगामी स्वरूपात काम बघताना खडतर प्रयास घेतले. त्याबद्दल मंडळ आभारी आहे.' 

विंडीज संघ पुढील महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध भारतात खेळेल. तीन टी-20, तीन वन-डे आणि एक कसोटी असे सामने होतील. 
 
​ ​

संबंधित बातम्या