वेस्ट इंडीज संघ भारताला झुंजवेल : व्हिव रिचर्डस

वृत्तसंस्था
Monday, 29 July 2019

भारतीय संघ या दौऱ्यात तीन टी- 20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्यास 3 ऑगस्टपासून सुरवात होईल. यातील कसोटी सामन्यांची मालिका ही जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेचा भाग असेल.

मुंबई : भारतीय संघाच्या आगामी वेस्ट इंडीज दौऱ्यात विंडीज संघ पाहुण्या संघाला झुंजवेल, अशी अपेक्षा वेस्ट इंडीजचे महान फलंदाज व्हिव रिचर्डस यांनी व्यक्त केली आहे.

भारतीय संघ या दौऱ्यात तीन टी- 20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्यास 3 ऑगस्टपासून सुरवात होईल. यातील कसोटी सामन्यांची मालिका ही जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेचा भाग असेल.

या मालिकेविषयी बोलताना रिचर्डस म्हणाले, "या दोन देशांमध्ये नेहमीच चांगले क्रिकेट खेळले जाते. सध्याच्या विंडीज संघाचा फॉर्म बघता हा संघ भारतीय संघाला नक्कीच चांगली झुंज देईल.''

या मालिकेतील सामन्यांचे थेट प्रसारण सोनी टेन 1, 2, 3 या वाहिन्यांवरून केले जाणार आहे. या विषयीची माहिती देण्याकरता आयोजित एका कार्यक्रमात रिचर्डससह भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकरही सहभागी झाले होते. ते म्हणाले, "मला नेहमीच विंडीज खेळाडू आणि क्रिकेटबाबत आदर वाटत आला आहे. माझी कारकीर्द वेस्ट इंडीजविरुद्धच सुरू झाली. त्यामुळे माझ्यासाठी भारताचा प्रत्येक विंडीज दौरा महत्त्वाचा असतो. दरवेळेप्रमाणे ही मालिकादेखील रंगतदार होईल.''

​ ​

संबंधित बातम्या