World Cup 2019 : विजेतेपदाची ट्रॉफी सचिनच्या हस्ते? 

वृत्तसंस्था
Monday, 8 July 2019

आंतरराष्ट्रीय क्रिकेैट परिषद (आयसीसी) या स्पर्धेत पारितोषिक वितरणाची परंपरा मोडून दुसऱ्या व्यक्तीच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्याची चर्चा आहे.

वर्ल्ड कप 2019 : लंडन : आंतरराष्ट्रीय क्रिकेैट परिषद (आयसीसी) या स्पर्धेत पारितोषिक वितरणाची परंपरा मोडून दुसऱ्या व्यक्तीच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्याची चर्चा आहे.

परंपरेनुसार आयसीसीच्या कार्याध्यक्षांच्या हस्ते पारितोषिक वितरण होते. त्यानुसार सध्याचे कार्याध्यक्ष शशांक मनोहर यांच्या हस्ते विजेत्या संघाला करंडक प्रदान करणे अपेक्षित आहे. मात्र, इकडे वेगळीच चर्चा सुरू आहे. विक्रमवीर फलंदाज सचिन तेंडुलकर किंवा गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार मायकेल क्‍लार्क यांच्यापैकी एकाच्या हस्ते करंडक प्रदान केला जाऊ शकतो. आयसीसी आणि युनिसेफ यांच्यात सामंजस्य करार आहे.

त्यामुळे युनिसेफचा राजदूत म्हणून सचिन तेंडुलकरच्या हस्ते हा सोहळा होऊ शकतो. या शिवाय ब्रिटिश राजघराण्यातील एखाद्या व्यक्तीच्या हस्ते देखील हा सोहळा पार पाडला जाऊ शकेल असे बोलले जात आहे. अर्थात, या संदर्भात अजून बकिंगहॅम पॅलेसमधून उपस्थिती संदर्भात कोणताही निरोप आलेला नाही.


​ ​

संबंधित बातम्या