Wimbledon 2019 : सेरेना बनणार का कमबॅक क्वीन?

मुकुंद पोतदार
Saturday, 13 July 2019

-  काही तासांत ऑल इंग्लंड क्लबच्या सेंटर कोर्टवर विंबल्डनच्या महिला एकेरीची फायनल सुरु होत आहे.

-  अमेरिकेची सेरेना विल्यम्स आणि रुमानियाची सिमोना हालेप यांच्यात निर्णायक मुकाबला रंगणार आहे.

- महिला टेनिसची सुपरस्टार ठरलेली सेरेना सुपरमॉम बनणार का हा सर्वाधिक उत्सुकतेचा विषय असेल.

लंडन : काही तासांत ऑल इंग्लंड क्लबच्या सेंटर कोर्टवर विंबल्डनच्या महिला एकेरीची फायनल सुरु होत आहे. अमेरिकेची सेरेना विल्यम्स आणि रुमानियाची सिमोना हालेप यांच्यात निर्णायक मुकाबला रंगणार आहे. महिला टेनिसची सुपरस्टार ठरलेली सेरेना सुपरमॉम बनणार का हा सर्वाधिक उत्सुकतेचा विषय असेल.

पुरुष टेनिसपटूंमध्ये तिच्या समकालीन अशा रॉजर फेडरर, रॅफेल नदाल, नोव्हाक जोकोविच यांनी विजयी पुनरागमन करीत कमबॅक किंग बनण्याचा पराक्रम केला आहे. टेनिसप्रेमींना सेरेनाकडून अशीच अपेक्षा आहे. सेरेनासाठी कमबॅक क्विन बनण्याबरोबरच ऑलटाईम ग्रेटेस्ट क्वीन बनण्यासाठी सुद्धा या जेतेपदाची प्रतिक्षा आहे. व्यावसायिक आणि हौशी युगांत सर्वाधिक 24 ग्रँड स्लॅम जेतेपदांचा उच्चांक ऑस्ट्रेलियाच्या मार्गारेट कोर्ट यांच्या नावावर आहे. व्यावसायिक युगात (ओपन एरा) सर्वाधिक 22 जेतेपदांचा जर्मनीच्या स्टेफी ग्राफचा उच्चांक सेरेनाने मागे टाकला आहे.

मार्गारेट कोर्ट यांच्या उच्चांकाशी बरोबरी करण्याची तिची महत्त्वाकांक्षा आहे. डिलीव्हरीच्यावेळी सेरेनाच्या प्रकृतीला गंभीर धोका निर्माण झाला होता. त्यामुळे तिचे पुनरागन लांबले. पुनरागमनानंतर सेरेनाची कामगिरी चांगलीच झाली आहे. गेल्या वर्षी फ्रेंच स्पर्धेतील चौथ्या फेरीनंतर ती विंबल्डन आणि अमेरिकन स्पर्धांत उपवजेती ठरली. यंदा मात्र ऑस्ट्रेलिन स्पर्धेत उपांत्यपूर्व, तर फ्रेंच स्पर्धेत तिसऱ्याच फेरीत ती हरली.

यानंतर आपण थेरपीस्टचे मार्गदर्शन घेतल्याचे सेरेनाने नुकतेच जाहीरपणे सांगितले आहे. यावरून ती यशासाठी किती आतूर आहे हे स्पष्ट होते. अंतिम फेरीतील सेरेनाचे प्रशिक्षक पॅट्रीक मौरातोग्लोऊ यांच्यावरून गेल्या वर्षी वाद झाला. त्यामुळे सेरेनाचे डोके फिरले होते. प्रामुख्याने फायनलमध्ये सेरेनाकडून काही वेळा वाद झाले आहेत, पण या विंबल्डनमध्ये सेरेनाला सर्वोत्तम फॉर्म गवसल्याचे दिसून येते.

सेरेनान ऑस्ट्रेलियन आणि विंबल्डन प्रत्येकी सात वेळा जिंकले आहे. यात तिला यशाची सर्वोत्तम संधी मात्र ऑस्ट्रेलियन पेक्षा विंबल्डनला जास्त आहे. याचे कारण हार्ड कोर्टच्या तुलनेत विंबल्डनला तिच्यासमोर कडवे आव्हान निर्माण करणाऱ्या तुल्यबळ प्रतिस्पर्धी कमी आहेत. महिला टेनिसमध्ये दिर्घ काळ अबाधित राहिलेला उच्चांक सेरेना मागे टाकणार का, तसे करण्याची तिला शेवटची संधी आहे. किंबहुना आजघडीच्या महिला टेनिसची अवस्था बघता मार्गारेट कोर्ट यांच्या उच्चांक मोडण्याची सर्वोत्तमच नव्हे तर एकमेव संधी असलेली स्पर्धक सेरेना असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच टेनिसप्रेमी आणि तज्ञांचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे.

सेरेनाचे यापूर्वीचे ग्रँड स्लॅम जेतेपद : 2017 मध्ये ऑस्ट्रेलिन

मातृत्वामुळे या स्पर्धांना मुकली : 4 (2017 मध्ये फ्रेंच, विंबल्डन, अमेरिकन), 2018 मध्ये ऑस्ट्रेलियन

- पुनरागमनानंतरची कामगिरी : 2018 चा मोसम
फ्रेंच : चौथ्या फेरीत रशियाच्या मारिया शारापोवाला पुढे चाल.
विंबल्डन : अंतिम फेरीत जर्मनीच्या अँजेलिक कर्बरविरुद्ध दोन सेटमध्ये 3-6, 3-6 असा पराभव.
अमेरिकन : अंतिम फेरीत जपनच्या नाओमी ओसाकाविरुद्ध 2-6, 4-6 असा पराभव.

- यंदाचा मोसम 
ऑस्ट्रेलियन : उपांत्यपूर्व फेरीत चेक प्रजासत्ताकाच्या कॅरोलीना प्लीस्कोवाविरुद्ध 4-6, 6-4, 5-7 अशी निराशाजनक हार
फ्रेंच : देशभगिनी सोफिया केनीनविरुद्ध 2-6, 5-7 अशी हा


​ ​

संबंधित बातम्या