बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश 

वृत्तसंस्था
Thursday, 20 June 2019

मुंबई : बर्मिंगहॅम येथे 2022 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (आयसीसी) तसेच इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने या निर्णयाचे स्वागत केले आहे. 

राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश होण्यासाठी आयसीसी तसेच इंग्लंड क्रिकेट मंडळाने नियोनबद्ध प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांन राष्ट्रकुल क्रीडा फेडरेशच्या मान्यतेचे फळ मिळाले. 

बर्मिंगहॅमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचे सामने होणार आहेत या निर्णयाचा आम्हाला फार मोठा आनंद झाला आहे. यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे तसेच राष्ट्रकुल क्रीडा फेडरेशनचे मी आभार मानतो असे आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनू स्वाहनी यांनी सांगितले. महिला क्रिकेटला नवे व्यासपीठ मिळत असल्याने नव्या पिढीला आपली गुणवत्ता दाखवण्याची आणखी एक संधी मिळेल, असेही ते म्हणाले. तर महिला क्रिकेटसाठी हा एक "माईलस्टोन' असेल असे मत इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी टॉम हॅरिसन यांनी व्यक्त केले.  

​ ​

संबंधित बातम्या