जागतिक महिला बॉक्‍सिंगमध्ये मेरीसह नवोदितांवर नजर

वृत्तसंस्था
Thursday, 3 October 2019

- सहा वेळची जगज्जेती मेरी कोम जागतिक महिला बॉक्‍सिंग स्पर्धेत  51 किलो वजनीगटात प्रथमच खेळणार आहे

- 51 किलो गटात  तिने ऑलिंपिक ब्रॉंझ आणि आशियाई क्रीडा स्पर्धा सुवर्णपदक जिंकले आहे. तिच्या या वेळच्या संघनिवडीवरूनही वाद झाला आहे

- नीरज (57 किलो), जमुना बोरो (54 किलो), मंजू बॉम्बरिया (64 किलो), नंदिनी (81 किलो), मंजू राणी (48 किलो) या प्रथमच जागतिक स्पर्धा खेळणाऱ्या बॉक्‍सरकडे जास्त नजर असेल

मुंबई - सहा वेळची जगज्जेती मेरी कोम एखाद्या स्पर्धेत खेळते त्या वेळी तिच्या कामगिरीकडेच लक्ष असते. पण, जागतिक महिला बॉक्‍सिंग कदाचित यास काहीसे अपवाद असेल. मेरी 51 किलो वजनीगटातील पहिल्या जागतिक विजेतेपदासाठी प्रयत्न करेल, तरी भारतीय महिला बॉक्‍सिंगच्या भवितव्यासाठी नवोदितांची कामगिरी कशी होते हेही महत्त्वाचे असेल. 
मेरी जागतिक महिला बॉक्‍सिंगचा चेहरा आहे. पण, ऑलिंपिक गट असलेल्या 51 किलो गटात तिने जागतिक स्पर्धा जिंकलेली नाही; मात्र या प्रकारात तिने ऑलिंपिक ब्रॉंझ आणि आशियाई क्रीडा स्पर्धा सुवर्णपदक जिंकले आहे. तिच्या या वेळच्या संघनिवडीवरूनही वाद झाला आहे, त्यामुळे मेरीसाठीही ही स्पर्धा महत्त्वाची आहे. रशियातील या स्पर्धेच्या वेळी खेळाडू आयोगाचीही निवडणूक होईल. त्यात स्थान मिळवण्याचीही मेरीला संधी आहे. 
रशियात होणाऱ्या या स्पर्धेत सरिता देवीकडेही लक्ष असेल. चाचणी स्पर्धा जिंकत ती या स्पर्धेस पात्र ठरली आहे. त्यापेक्षाही नीरज (57 किलो), जमुना बोरो (54 किलो), मंजू बॉम्बरिया (64 किलो), नंदिनी (81 किलो), मंजू राणी (48 किलो) या प्रथमच जागतिक स्पर्धा खेळणाऱ्या बॉक्‍सरकडे जास्त नजर असेल. स्वीटी बोराकडे (75 किलो) दुर्लक्ष करू नका, असे सांगितले जात आहे. 


​ ​

संबंधित बातम्या