जागतिक बॅडमिंटन: ली चोंग वेईची माघार श्रीकांतच्या पथ्यावर? 

वृत्तसंस्था
Tuesday, 24 July 2018

जागतिक स्पर्धा 30 जुलैपासून सुरू होईल. या स्पर्धेच्या सराव शिबिरासाठी मलेशियाने आयोजित केलेल्या शिबिरात तो सहभागी झालेला नाही. चीनमध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेत चोंग वेईला दुसरे मानांकन आहे. स्पर्धेच्या ड्रॉनुसार श्रीकांत आणि चोंग वेई यांची उपांत्यपूर्व फेरीत लढत अपेक्षित आहे. 

मुंबई : ली चॉंग वेई हा जागतिक बॅडमिंटन तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेतून माघार घेण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा विजेत्या ली चोंग वेईच्या संभाव्य अनुपस्थितीचा जागतिक स्पर्धेत श्रीकांतला फायदा होईल. 

जागतिक स्पर्धा 30 जुलैपासून सुरू होईल. या स्पर्धेच्या सराव शिबिरासाठी मलेशियाने आयोजित केलेल्या शिबिरात तो सहभागी झालेला नाही. चीनमध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेत चोंग वेईला दुसरे मानांकन आहे. स्पर्धेच्या ड्रॉनुसार श्रीकांत आणि चोंग वेई यांची उपांत्यपूर्व फेरीत लढत अपेक्षित आहे. 

ली चॉंग वेईच्या शिबिरातील अनुपस्थितीची मलेशियातील माध्यमात चांगलीच चर्चा आहे. त्याने आपल्याला विश्रांतीची गरज आहे. त्याची ही विनंती ऐकून मला धक्काच बसला. अनफिट असतानाही तो पुनर्वसनासाठी ट्रेनिंग सेंटरला येत असे. जागतिक स्पर्धा एका आठवड्यावर असताना त्याचा ब्रेक धक्कादायक आहे. तो आमच्यापासून काय लपवत आहे का, याबाबत मी काही बोलणार नाही; पण विश्रांतीची गरज त्याला चांगलीच भासत असेल, तो त्याचा हक्क आहे, असे मलेशियाचे मार्गदर्शक दातून मिसबुन सिदेक यांनी सांगितल्याचे वृत्त आहे. 

चोंग वेईच्या अनुपस्थितीचा श्रीकांतला नक्कीच फायदा होईल. दोघातील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीकांत पराजित झाला होता. बॅडमिंटन अभ्यासक चॉंग वेईची चांगलाच धोकादायक असलेल्या झु वेई वॅंग याच्याविरुद्ध लढत अपेक्षित आहे. या लढतीतच चोंग वेई याचा कस लागला असता, असे सांगितले जात आहे.

​ ​

संबंधित बातम्या