World Cup 2019 : भारत-पाक सामन्यासाठी ख्रिस गेलने केलेली तयारी पाहिली का?

वृत्तसंस्था
Sunday, 16 June 2019

मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डमध्ये आज (रविवार) खेळल्या जाणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेतील भारत-पाक सामन्याकडे पूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे.

वर्ल्ड कप 2019 : मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डमध्ये आज (रविवार) खेळल्या जाणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेतील भारत-पाक सामन्याकडे पूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. क्रिकेट विश्वातील सर्व क्रिकेटप्रेमी या सामन्याची आतुरतेने वाट पाहात असताना वेस्ट इंडिजचा तुफानी फलंदाज ख्रिस गेलही मागे राहिला नाही.

ख्रिस गेलने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली असून त्याचा एक फोटोही अपलोड केला आहे. या फोटोत त्याने भारत-पाकिस्तान देशांच्या राष्ट्रध्वजांचे रंग असलेला सूट घातलेला दिसून येत आहे. या सूटला त्याने 'इंडिया-पाकिस्तान सूट' असे नाव दिले आहे. या सूटमधून मी दोन्ही देशांप्रति प्रेम आणि आदर दाखवत आहे. हा सूट मला खूप आवडला असून मी माझ्या वाढदिवसाच्या पार्टीत घालणार आहे. त्याने दोन्ही संघांना या सामन्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
 
1992 नंतर झालेल्या सहा विश्वचषक सामन्यात भारताने पाकिस्ताविरुद्ध विजय मिळविला आहे, मात्र 2017 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पाकिस्तानने भारताला पराभूत केले आहे. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल. 

"आम्ही चांगला खेळ केला, तर आम्ही कोणालाही हरवू शकतो. सामना कोणाही विरुद्ध असो त्याने काही फरक पडत नाही," असे कर्णधार विराट कोहलीने काल (शनिवार) झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.


​ ​

संबंधित बातम्या