World Cup 2019 : टीम इंडियाच्या बसवर फुलांची उधळण (व्हिडिओ)

वृत्तसंस्था
Tuesday, 9 July 2019

विश्वकरंडकात आज (मंगळवार) भारताचा न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना होत असून, या सामन्यासाठी भारतीय संघ हॉटेलमधून रवाना होत असताना संघाच्या बसवर भारतीय चाहत्याकडून फुलांची उधळण करण्यात आली.

मँचेस्टर : विश्वकरंडकात आज (मंगळवार) भारताचा न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना होत असून, या सामन्यासाठी भारतीय संघ हॉटेलमधून रवाना होत असताना संघाच्या बसवर भारतीय चाहत्याकडून फुलांची उधळण करण्यात आली.

मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर भारतीय संघ हॉटेलमधून आज सकाळी रवाना झाला. यावेळी भारतीय संघाच्या स्वागतासाठी अनेक चाहते उपस्थित होते. यावेळी एका चाहत्याने जितेगा भाई जितेगा, इंडिया जितेगा अशा घोषणा दिल्या. तसेच या चाहत्याने पिशवीतून आणलेल्या फुलांची भारतीय संघाच्या बसवर उधळण केली.

भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. विश्वकरंडकात दुसरा सामना ऑस्ट्रेलिया आणि यजमान इंग्लंड यांच्यात होणार आहे. विश्वकरंडकाचा अंतिम सामना 14 जुलैला लॉर्डस मैदानावर होणार आहे.
 


​ ​

संबंधित बातम्या