World Cup 2019 : आला रे आला पंत संघात आला!

वृत्तसंस्था
Sunday, 30 June 2019

चौथ्या क्रमांकावर विजय शंकरच्या ऐवजी दिनेश कार्तिक किंवा रिषभ पंतला संघात स्थान देण्यात यावे अशी मागणी जोर धरत होती. त्यानुसार, कोहलीने पंतला संधी दिली आहे. ​

वर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड या संभाव्य विजेत्यांमध्ये होणाऱया सामन्यात संपूर्ण स्टेडियम निळ्या रंगाने भरुन गेला. इंग्लंडच्या एकही सामन्यात पाऊस पडला नाही. आजही पावसाची चिन्हे नसल्याने इंग्लंडचा कर्णधार इयॉन मार्गनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. 

सामन्यापूर्वी भारताचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारने गोलंदाजीचा सराव केला खरा मात्र, आजही त्याला संधी मिळाली नाही आणि शमीचे संघातील स्थान कायम राहिले. चौथ्या क्रमांकावर विजय शंकरच्या ऐवजी दिनेश कार्तिक किंवा रिषभ पंतला संघात स्थान देण्यात यावे अशी मागणी जोर धरत होती. त्यानुसार, कोहलीने पंतला संधी दिली आहे. 

इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय दुखापतीतून सावरला असून त्याने संघात पुनरागमन केले आहे. तसेच मोईन अलीऐवजी लियाम प्लंकेटला संधी देण्यात आली आहे. 

''आम्हाला धावांचा पाठलाग करणे कधीच अवघड नव्हते. आम्ही प्रतिस्पर्धी संघाकडे नाही तर आमच्या कामगिरीकडे लक्ष देतो. रिषभ पंत 20 धावांच्या पुढे गेला, की त्याला रोखणे अवघड आहे. आम्हाला खात्री आहे, की आज पाकिस्तानचे चाहतेही आम्हाला पाठिंबा देत असतील.'' असे मत कोहलीने व्यक्त केले.


​ ​

संबंधित बातम्या