World Cup 2019 : पाकने स्वप्नापेक्षा वास्तविकता स्वीकारली; केल्या त्रिशतकी धावा पण गाशा गुंडाळला

वृत्तसंस्था
Friday, 5 July 2019

अशक्‍यप्राय धावांचा डोंगर पाकिस्तान उभारणार का? आणि बांगलादेशला कमित कमी धावांत गुंडाळणार का? अशा हिंदोळ्यावर झालेल्या लॉर्डवर झालेल्या सामन्यात पाकिस्तानने स्वप्नापेक्षा वास्तवता स्वीकारली आणि केवळ उपांत्य फेरीचा नाद सोडून केवळ बांगलादेशविरुदधचा सामना जिंकण्याच्या दृष्टीने फलंदाजी केली.

वर्ल्ड कप 2019 : लॉर्डस्‌ : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतले पाकिस्तानचे आव्हान अखेर संपुष्टात आले आणि उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणारा न्यूझीलंड चौथा संघ ठरला. बांगलादेशविरुद्धच्या बहुचर्चित सामन्यात पाकिस्तानन 315 धावांपर्यंत मजल मारली. इमान उल हकने शतक केले तर बाबर आझम 96 धावांवर बाद झाला. बांगलादेशकडून मुस्तफिझुर रहिमने पाच विकेट मिळवले. 

अशक्‍यप्राय धावांचा डोंगर पाकिस्तान उभारणार का? आणि बांगलादेशला कमित कमी धावांत गुंडाळणार का? अशा हिंदोळ्यावर झालेल्या लॉर्डवर झालेल्या सामन्यात पाकिस्तानने स्वप्नापेक्षा वास्तवता स्वीकारली आणि केवळ उपांत्य फेरीचा नाद सोडून केवळ बांगलादेशविरुदधचा सामना जिंकण्याच्या दृष्टीने फलंदाजी केली. नाणेफेकेकीचा कौल त्यांच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारली तेव्हा क्रिकेट विश्‍वात कमालीची उत्सुकता पसरली होती, पण सलामीवीर फकर झमान आणि इमाम उल हक यांचा पवित्रा पाहून सर्वांना हा सामना केवळ त्या लढतीपूरता निकाली ठरणार याची कल्पना आली. 

फकर झमान अडखत होता आणि 13 धावांवर बाद झाला, पण त्यानंतर इमान आणि बाबर यांनी बांगलादेशच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. धावांचा चांगला वेल कायम ठेवत त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी 157 धावांची भागीदारी केली. बाबर शतकापासून चार धावा दूर असताना सैफउद्दीनच्या यॉर्करवर बाद झाला. मात्र इमानने शतकाची संधी साधली परंतु तो बरोबर 100 धावांवर बाद झाला. 

या दोन फलंदाजांचा अपवाद वगळता पाकिस्तानच्या इतर फलंदाजांनी संधीचा फायदा घेता आला नाही. डावाच्या मध्यावर तर त्रिशतकी धावाही कठिण वाटत होत्या, परंतु इमाद वसिमने 26 चेंडूत 43 धावांचा तडाखा दिला. याच इमाद आणि आमिरला अखेरच्या षटकात सलग दोन चेंडूवर बाद करून मुस्तफिझूरने पाच विकेट मिळवण्याची कामगिरी केली. 

संक्षिप्त धावफलक : 

पाकिस्तान : 50 षटकांत 9 बाद 315 (इमाम उल हक 100 -100 चेंडू, 7 चौकार, बाबर आझम 96 -98 चेंडू, 11 चौकार, इमाम वसिम 43 -26 चेंडू, 6 चौकार, 1 षटकार, महम्मद सैफउद्दीन 9-0-77-3, मुस्तफिझूर रहिम 10-0-75-5)


​ ​

संबंधित बातम्या