शमीवर अन्याय झाला; ट्विटरवर संघ निवडीवर प्रश्न

वृत्तसंस्था
Tuesday, 9 July 2019

भारताचा प्रमुख गोलंदाज आणि विश्वकरंडकात हॅट्ट्रिक घेणाऱ्या महंमद शमीला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात संघातून वगळण्यात आल्याने ट्विटरवर संघ निवडीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

मँचेस्टर : भारताचा प्रमुख गोलंदाज आणि विश्वकरंडकात हॅट्ट्रिक घेणाऱ्या महंमद शमीला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात संघातून वगळण्यात आल्याने ट्विटरवर संघ निवडीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

भारतीय संघ व्यवस्थापनाने न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी शमीला संघाबाहेर ठेवले. चायनामन गोलंदाज कुलदीप यादवलाही संघातून वगळून युझवेंद्र चहलला संघात स्थान देण्यात आले आहे. रवींद्र जडेजाला स्थान देण्यात आले आहे.

यापूर्वीही श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शमीला संघातून वगळण्यात आल्याने संघ व्यवस्थापनावर टीका करण्यात आली होती. भाजप नेत्याच्या दबावामुळेच शमीला संघातून वगळण्यात आल्याचे बोलले जात आहे. तर, शमी मुस्लिम असल्याने त्याला संघात सतत स्थान देण्यात येत नसल्याचीही टीका होत होती. आता पुन्हा एकदा शमीला वगळण्यात आल्याने पुन्हा एकदा टीकेला धार चढली आहे.
 


​ ​

संबंधित बातम्या