World Cup 2019 : यंदाची पावसाळी विश्‍वकरंडक स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 June 2019

विश्‍वकरंडक स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत 2007 मधील स्पर्धात सर्वाधिक रटाळ आणि निरस मानली जोत होती.

वर्ल्ड कप 2019 : लंडन : विश्‍वकरंडक स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत 2007 मधील स्पर्धात सर्वाधिक रटाळ आणि निरस मानली जोत होती. मात्र, पावसाच्या सतत्या व्यत्ययामुळे यंदाच्या स्पर्धेत अजून रंग भरले जात नाहीत. पावसाचा अजूनही अंदाज असल्यामुळे इतिहासत ही स्पर्धा कदाचित पावसाळी म्हणून ओळखली जाईल.

या स्पर्धेत आतापर्यंत चार सामने पावसामुळे वाया गेले आहेत. यात तीन सामन्यात नाणेफेकही होऊ शकलेली नाही. रद्द झालेल्या वेस्ट इंडिज-दक्षिण आफ्रिका या सामन्यातही केवळ 7.3 षटकांचा खेळ झाला होता.

आतापर्यंत स्पर्धेच्या इतिहासात दोनच सामने नाणेफेकीशिवाय रद्द झाले होते. यातील पहिला सामना 1979च्या स्पर्धेत श्रीलंका वि. वेस्ट इंडिज, तर दुसरा सामना 2015 मध्ये ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश यांचा होता. 

नाणेफेक न होता रद्द सामने 
1975 ते 2015 : 402 सामन्यात 2 सामने 
2019 : 18 सामन्यात 3 सामने 

आगामी सात दिवसात 
विश्‍वकरंडक स्पर्धेत आगामी सात दिवसांत आठ सामने होणार आहेत. यातील केवळ तीन सामन्यात पावसाचा अंदाज नाही. पावसाची शक्‍यता असणाऱ्या सामन्यात रविवारच्या भारत-पाकिस्तान या सामन्याचा समावेश आहे.
 
श्रीलंका संघाचा पाठलाग 
या स्पर्धेत पावसाने श्रीलंका संघाचा सर्वाधिक पाठलाग केला आहे. त्यांचे दोन सामने रद्द झाले आहेत. त्याचवेळी त्यांचा एकमात्र विजय देखील पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात झाला. अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या त्यांच्या सामन्यात डकवर्थ-लुईस नियमाचा वापर झाला होता. 
 
राखीव दिवसाला नकार का ? 
- स्पर्धेचा कालावधी लांबला असता 
- खेळपट्टी बनवणे, संघांची विश्रांती, प्रवासाचे दिवस, राहण्याची व्यवस्था, केंद्रांची उपलब्धता या सगळ्यावरच ताण 
- थेट प्रसारणासाठी धावपळीचा काळ, त्यापेक्षा सामन्यांना प्राधान्य देणाऱ्या प्रेक्षकांची फरपट 
- राखीव दिवशी कशावरून पाऊस पडणार नाही?


​ ​

संबंधित बातम्या