FIFA World Cup 2022 : पात्रता फेरीचे भारतातील सामने होणार 'या' ठिकणी

वृत्तसंस्था
Thursday, 1 August 2019

पात्रता फेरीत भारताचा समावेश कतार, ओमान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशसह ई गटात करण्यात आला आहे. यातील पहिला सामना 5 सप्टेंबर रोडी ओमानशी गुवाहटी येथील इंदिरा गांधी ऍथलेटिक्‍स स्टेडियमवर होणार आहे.

नवी दिल्ली : विश्‍वकरंडक फुटबॉल 2022च्या स्पर्धेसाठी होणाऱ्या आशिया गटाच्या पात्रता फेरीतील भारताचे पहिले दोन सामने गुवाहटी आणि कोलकत्याला होणार आहेत. भारतीय फुटबॉल महासंघानेच ही माहिती दिली.

पात्रता फेरीत भारताचा समावेश कतार, ओमान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशसह ई गटात करण्यात आला आहे. यातील पहिला सामना 5 सप्टेंबर रोडी ओमानशी गुवाहटी येथील इंदिरा गांधी ऍथलेटिक्‍स स्टेडियमवर होणार आहे. भारत 10 सप्टेंबरला कतारशी त्यांच्या देशात खेळेल. त्यानंतर मायदेशातील दुसरा सामना बांगलादेशशी कोलकत्याच्या साल्ट लेक स्टेडियमवर 15 ऑक्‍टोबरला होईल.

त्यानंतर 14 नोव्हेंबरला भारत अफगाणिस्तानशी आणि 19 नोव्हेंबरला ओमानशी त्यांच्या देशात जाऊन खेळेल. पुढे 26 मार्च 2020मध्ये भारत घरच्या मैदानवार कतारशी खेळेल. नंतर 4 जूनला बांगलादेशात जाईल आणि अखेरचा सामना भारतात 9 जून रोजी अफगाणिस्तानशी खेळेल.


​ ​

संबंधित बातम्या