World Cup 2019 : पिपाणी वाजवणाऱ्या आजी पोहोचल्या पेप्सीच्या जहिरातीत (व्हिडिओ)

वृत्तसंस्था
Tuesday, 9 July 2019

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेदरम्यान बर्मिंगहॅम स्टेडियममध्ये बांगलादेश संघाच्या विरुद्द सामना सुरु असताना एका आजीबाईंची चांगलीच चर्चा झाली होती. 87 वर्षाच्या चारुलता पटेल यांचा स्टेडियममधील उत्साह पाहून अनेकजण हैराण झाले होते. त्यांचे फोटो मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते.

वर्ल्ड कप 2019 : नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेदरम्यान बर्मिंगहॅम स्टेडियममध्ये बांगलादेश संघाच्या विरुद्द सामना सुरु असताना एका आजीबाईंची चांगलीच चर्चा झाली होती. 87 वर्षाच्या चारुलता पटेल यांचा स्टेडियममधील उत्साह पाहून अनेकजण हैराण झाले होते. त्यांचे फोटो मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते.

आता याच आजीबाईंचा एक नवा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. पटेल आजीबाईंचा पेप्सिकोने एका अॅडवर्टाईजमेंट कैम्पेनमध्ये समावेश केला आहे. पेप्सी ने चारुलता पटेल यांना एका जहिरातीत काम दिले असून हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवरून शेअर केला आहे.
 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनीही पटेल यांच्या सर्व क्रिकेट सामन्यांचा खर्च उचलण्याची तयारी दर्शविली होती. तर अमूल या कंपनीनेदेखिल त्यांच्यावर एक डूडल बनवून त्यांचा सम्मान केला होता.


​ ​

संबंधित बातम्या