WWE च्या Hall of Fame मध्ये स्थान मिळाल्यावर द ग्रेट खली झाला भावूक (VIDEO)

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Thursday, 25 March 2021

Hall Of Fame च्या यादीत नाव सामील झाल्याची बातमी कळल्यानंतर खली भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

माजी WWE चॅम्पियन आणि भारतीय दिग्गज पैलवान द ग्रेट खली (The Great Khali) ला WWE हॉल ऑफ फेम (Hall of Fame) 2021 च्या यादीत स्थान देण्यात आले आहे.  WWE India ने यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर करुन माहिती दिली आहे. द ग्रेट खली याने WWE च्या रिंगणात उतरत भारतीय ताकदीची झलक जगाला दाखवून दिली होती. 
खलीने 7 एप्रिल 2006 साली SmackDown मध्ये एन्ट्री केली होती. त्यावेळी द अंडरटेकर आणि मार्क हेन्रीचा एक सामना सुरु होता. या सामन्यात खलीला पाहून अंडर टेकर हैराण झाल्याचे पाहायला मिळाले होते.

अंडर टेकरने  खलीवर चाल केली पण ती व्यर्थ ठरली होती. त्याने अंडर टेकरला चित करत आपल्या ताकदीची झलक दाखवून दिली होती. त्यानंतर जवळपास आठ वर्षे खली WWE रिंगणात वेगवेगळ्या लढतीवेळी दिसला.  खलीने आपल्या कारकिर्दीत केवळ एकदाच वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिप जिंकली आहे. मात्र आपली विशेष शैली आणि एक्शनमुळे तो चांगलाच चर्चेत आला.  2017 मध्ये WWE रिंगणात कमबॅक करताना तो रँडी ऑर्टन विरुद्धच्या लढतीत जिंदर महलची मदत करताना दिसला होता. 

ISSF World Cup: नेमबाजीत भारताचे वर्चस्व; पदकांच्या टॅलीवर एक नजर

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by WWE India (@wweindia)

Hall Of Fame च्या यादीत नाव सामील झाल्याची बातमी कळल्यानंतर खली भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचा तत्कालीन मॅनेजर आणि WWE च्या क्रिएटिव्ह टीमचा सदस्य रंजन सिंह यांनी व्हिडिओ कॉल करुन त्याला सरप्राइज दिल. यावेळी खलीसोबत त्याची पत्नी आणि मुलगीही आनंदीत झाल्याचे पाहायला मिळाले.  खलीने भारतामध्ये रेसलिंग अकादमी सुरु केली आहे. त्याच्या अकादमीने WWE ला चांगले रेसलरही दिले आहेत. यात कविता देवीचा समावेश आहे. खली हा WWE च्या Hall of Fame मध्ये स्थान मिळणारा भारताचा पहिला सुपरस्टार ठरलाय.


​ ​

संबंधित बातम्या