माजी WWE चॅम्पियन आणि आयोजकांमध्ये खटके उडाल्याची चर्चा

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 3 January 2021

Stardom's च्या दहाव्या हंगामातील धमाका बूडोकान हॉलमध्ये 3 मार्च 2021 ला होणार आहे. जपानमधील टोकियोमध्ये होणाऱ्या वुमन्स रेसलिंग प्रमोशन इव्हेंटसाठा माजी सुपरस्टार्संना बोलवण्यात येते.

WWE  सुपरस्टारचा बहुमान मिळवणारी जपानी महिला रेसलर कायरी सेन (Kairi Sane) आणि  WWE च्या आयोजकांमध्ये वादावादी झाल्याचे वृत्त आहे.  3 मार्च पासून सुरु होणाऱ्या  Stardom's या शोच्या करारावरुन कायरी सेन आणि आयोजंकामध्ये खटके उडल्याची चर्चा WWE च्या वर्तुळात रंगत आहे. जपानच्या टोकियोमध्ये 7 सप्टेंबर 2010 पासून स्टारडम हा महिला रेसलिंगचा मनोरंजक महिला कुस्ती शो आयोजित केला जातो. दहाव्या वर्षी होणाऱ्या शोसंदर्भात कायरी सेन WWE च्या जपानमधील कार्यालयात गेली होती. WWE आणि कारया सेन यांच्यात करारावरुन बिनसल्याचे बोलले जात आहे. 

Stardom's च्या दहाव्या हंगामातील  धमाका बूडोकान हॉलमध्ये 3 मार्च 2021 ला होणार आहे. जपानमधील टोकियोमध्ये होणाऱ्या वुमन्स रेसलिंग प्रमोशन इव्हेंटसाठा माजी सुपरस्टार्संना बोलवण्यात येते.  कार्यक्रम खास करण्याच्या उद्देशाने माजी सुपरस्टार्सला निमंत्रित केले जाते. कायरी सेन जपानमधील लोकप्रिय महिला रेसलरपैकी एक आहे. याशिवाय तिने WWE मधील NXT मध्ये वुमन्स चॅपियनशिपवरही नाव कोरले आहे. एवढेच नाही तर रोस्टरमध्ये वुमन्स टॅग टीम चॅम्पियनशिपही जिंकली आहे.  

NXT या अमेरिकन टेलिव्हिजन शोमध्ये एन्ट्री केल्यानंतर कायरी सेनने WWE च्या रिंगणात प्रवेश केला होता. कायरी आणि असुका (जपानी प्रोफेशनल रेसलर) यांना एकत्रित दाखवण्यात आले. त्यांच्या टीमला कुबकी वॉरियर्स असे नाव देण्यात आले होते. मागील वर्षी कायरी सेनने रेसलिंगमधून ब्रेक घेण्याचे ठरवले. ती जपानला जाऊन आपल्या पतीसोबत राहत आहे.  WWE आणि कायरी सेन यांच्यातील खूप चांगले संबंध आहेत. आगामी  Stardom's शोमुळे यात मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.  

जानेवारी 2012 मध्ये कओरी हाउसको (Kaori Housako) हिने World Wonder Ring Stardom च्या रिंगमधून व्यावसायिक रेसलिंगमध्ये पदार्पण केले होते. पुढील पाच वर्षात ती एकवेळा वर्ल्ड ऑफ स्टारडम चॅम्पियन, तीन वेळा गोल्डेस्ट ऑफ स्टारडम चॅम्पियन आणि चारवेळा आर्टिस्ट ऑफ स्टारडम चॅम्पियन राहिली आहे.  2017 मध्ये ती WWE सोबत करारबद्ध झाली होती. 


​ ​

संबंधित बातम्या