ट्रिपल एच WWE च्या रिंगणात उतरला अन् हातातील हातोड्यानं आग ओकली

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Tuesday, 12 January 2021

ट्रिपल एचने  बॅकस्टेजला ऑर्टनचे चॅलेंज स्वीकारले. त्यानंतर RAW च्या मेन इव्हेंटमध्ये दोन्ही दिग्गजांचा सामना रंगला.

WWE च्या रिंगणात आणखी एका लोकप्रिय स्टारची एन्ट्री झाली. मागील आठवड्यात रॉ (RAW) मध्ये गोल्डबर्ग (Goldberg) ची एन्ट्री पाहायला मिळाल्यानंतर या आठवड्यातील रेड ब्रांडमध्ये दिग्गज ट्रिपल एच(Triple H) ने कमबॅक करुन चाहत्यांना सरप्राइज दिले. ट्रिपल एचने खूप दिवसानंतर रिंगमध्ये येऊन शोला सुरुवात केली. यावेळी तो पहिल्यापेक्षा वेगळ्या अंदाजात दिसला. तो माइक हातामध्ये घेऊन बोलायला सुरुवात करायच्या अगोदरच रँडी ऑर्टन(Randy Orton) ची एन्ट्री झाली.

ड्रू मॅकइंटायरच्या जागी रिंगणात उतरल्याचे सांगत रँडी ऑर्टनने चॅम्पियनशिपसंदर्भात मोठे वक्तव्य केले. ट्रिपल एचने त्याला अगोदर Royal Rumble मध्ये जिंकून दाखव, असे म्हटले. दिग्गजांना त्रास देण्याचा तुझा अंदाज आवडलेला नाही, असेही ट्रिपल एचने ऑर्टनला सुनावले. RAW मध्ये मॅच खेळण्याचे ऑर्टनचे चॅलेंज ट्रिपल एचने धुडकावून लावल्याचेही पाहायला मिळाले. त्यानंतर रँडी ऑर्टनने स्टेफनी आणि त्याला अपशब्द वापरले. यावेळी द गेमने रागाच्या भरात रँडी आर्टनवर हल्ला केल्याचे दिसून आले. 

Thailand Badminton Open : सायनाच्या रिपोर्टचा झोल; कोर्टवर उतरण्याचा मार्ग मोकळा!

ट्रिपल एचने  बॅकस्टेजला ऑर्टनचे चॅलेंज स्वीकारले. त्यानंतर RAW च्या मेन इव्हेंटमध्ये दोन्ही दिग्गजांचा सामना रंगला. दोघांनी सुरुवातीला एकमेकांवर हल्ला चढवला. ट्रिपल एचने प्रतिस्पर्धी ऑर्टनच्या चेहऱ्यावर रक्त माखेपर्यंत मारल्याचे दिसले. लढतीत सुरुवातीपासूनच ट्रिपल एचची पकड दिसली. या मॅच दरम्यान ट्रिपल एचच्या हाती एक हातोडा लागला. हळूहळू लाईट बंद झाली आणि ट्रिपल एचच्या हातोड्याला आग लागली. एलेक्साने रिंगमध्ये उतरुन ऑर्टनची अवस्था बिकट केल्याचे पाहायला मिळाले. Royal Rumble मध्ये येथून मुठे मोठी लढत होण्याची शक्यता आहे.  


​ ​

संबंधित बातम्या