बापामुळं लेक हारली! विजेती 30 वर्षीय चॅम्पियन म्हणते; मी तुझी सावत्र आई

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 6 January 2021

रिक फ्लेयर (Ric Flair)ने स्वत:च्या मुलीचा म्हणजेच शार्लेट (Charlotte Flair) चा पाय पकडला. याचा फायदा उठवत  लेसी इवांस (Lacey Evans) ने तिला रॉल पिन केल्याचे पाहायला मिळाले.

WWE दिग्गज रिक फ्लेयर (Ric Flair) या आठवड्यात झालेल्या रॉ (Raw) लीजेंड्री नाइटमध्ये रिंगमध्ये उतरल्याचे पाहायला मिळाले. रिक फ्लेयरमुळे त्याची मुलगी शार्लेट फ्लेयर (Charlotte Flair) ला पराभवाचा सामनाही करावा लागला. शार्लेट फ्लेयर (Charlotte Flair) आणि असुका (Asuka) ने टॅग टीम तयार करुन लेसी इवांस (Lacey Evans) आणि पेटन रॉयस (Peyton Royce) यांच्याविरुद्ध मॅच खेळली.

रिक फ्लेयर (Ric Flair)ने स्वत:च्या मुलीचा म्हणजेच शार्लेट (Charlotte Flair) चा पाय पकडला. याचा फायदा उठवत  लेसी इवांस (Lacey Evans) ने तिला रॉल पिन केल्याचे पाहायला मिळाले. या सर्व प्रकारानंतर शार्लेटने वडिलांवर रिंगमध्येच रागही व्यक्त केल्या. तुम्ही इथून निघून जा असे तिने बजावले. यासर्व प्रकाराची रिक फ्लेयरने सोशल मीडियावर माफीही मागितली आहे. मात्र त्यानंतर लेसी इवांसने आणखी ट्विस्ट निर्माण केले. 

WWE NXT Championship टायटलसाठी दोन जखमी वाघ भिडणार; तिसरा चॅम्पियन त्यांना नडणार!

लेसी इवांसने मॅचदरम्यान WWE के हॉल ऑफ फेम रिक फ्लेयरसोबत फ्लर्टिंग केले. याशिवाय लढत जिंकल्यानंतर तिने  रिक फ्लेयरला किस देखील केल्याचे पाहायला मिळाले. तिने केलेला हा सर्व प्रकार WWE ची माजी वुमन्स चॅम्पियन शार्लेट फ्लेयरला चांगलाच खटकला. तिने याचा राग आपल्या वडिलांवर काढलाही.

पण त्यानंतर बाप-लेकीत आता सर्वकाही ठिक झाले आहे. सोशल मीडियावरील एका पोस्टमधून ते दिसून आले. बाप-लेकीतील गोडवा लेसीला रुचलेला दिसत नाही. 30 वर्षीय लेसीने रिक फ्लेयर आणि शार्लेटच्या फोटोवर कमेंट केले आहे. आता तू मला सावत्र आई समज, अशा शब्दात लेसीने शार्लेटची फिरकी घेतली आहे. 


​ ​

संबंधित बातम्या