जर रोमन रेंसला हरवले नाहीस तर तुझी धुलाई करेन; पीयर्सला धमकी

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Saturday, 9 January 2021

एडम पीयर्स अनुभवी रेसलर आहे. त्याने तब्बल पाचवेळा NWA वर्ल्ड चॅम्पियनशिपचा बहुमान मिळवला आहे.

WWE हॉल ऑफ फेम 'द आयर्न शेख'ने एडम पीयर्सला धमकीच्या अंदाजात यूनिवर्सल चॅम्पियनशिपमध्ये रोमन रेंस (Roman Reigns) पराभूत करण्याचे आव्हान दिले आहे. जर तू रोमन रेंसला पराभूत केले नाहीत तर तुझी पिटाई करेन, अशी धमकीच त्याने पीयर्सला दिलीय. 

या आठवड्याच्या स्मॅकडाउन(SmackDown) मध्ये कल्पनेत नसणारे चित्र पाहायला मिळाले. कारण WWE Royal Rumble 2021 साठी पीयर्सने रोमन रेंस विरुद्ध WWE यूनिवर्सल चॅम्पियनशिप सामना मिळवला आहे. गौंटलेट मॅचमध्ये दमदार कामगिरीच्या जोरावर शिंस्के नाकामुरा(Shinsuke Nakamura) SmackDown मधील सर्वात मोठा स्टार ठरला. मात्र ट्राइबल चीफ आणि उसो(Jey Uso) ने नाकामुरावर आक्रमन करत पीयर्सला जिंकण्यात मदत केली. 

अश्विनविरुद्ध केलेल्या स्ट्रॅटर्जीचा फायदा झाला - स्टीव्ह स्मिथ

या लढतीमध्ये पीयर्सने विजय मिळवल्यानंतर द आयर्न शेखने एक ट्वीट केले आहे. पीयर्स रेसलिंग बिझनेसचा नियमिच सन्मान करत आला आहे, असा उल्लेख त्याने या ट्विटमध्ये केलाय. त्याने ट्विटमध्ये लिहिलंय की, "एडम पीयर्स तू प्रो रेसलिंग बिझनेस आणि दिग्गजांचा नेहमीच सन्मान केला आहेत. तुला जिंकण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरायला हवेस. जर तू रोमन रेंसला हरवले नाहीस तर मी तुला सोडणार नाही. 

AusvsInd : दिवसाअखेर पारडे पुन्हा कांगारुकडे झुकलं; स्मिथ-लाबुशेन डोकेदुखी वाढवणार?

एडम पीयर्स अनुभवी रेसलर आहे. त्याने तब्बल पाचवेळा NWA वर्ल्ड चॅम्पियनशिपचा बहुमान मिळवला आहे. त्यामुळे टॉप टायटल जिंकण्याचा आनंद काय असतो याची त्याला चांगलीच जाणीव आहे. पण त्याचा पुढचा प्रवास सहज सोपा नाही.  रोमन रेंस विरुद्ध भल्या भल्या WWE सुपर स्टार्संनी गुडघे टेकले आहेत. यूनिवर्सल टायटल आपल्याकडे ठेवण्यासाठी तो काहीही करु शकतो. पीयर्स आणि रोमन रेंस यांच्यातील WWE Royal Rumble च्या रिंगमधील सामना पाहण्याजोगा निश्चितच असेल. पीयर्स 2014 पासून रिंगपासून दूर आहे. त्यामुळे 6 वर्षानंतर रिंगमध्ये दर्जेदार खेळ करण्याचे मोठे आव्हान त्याच्यासमोर असणार आहे.   


​ ​

संबंधित बातम्या