WWE NXT Championship टायटलसाठी दोन जखमी वाघ भिडणार; तिसरा चॅम्पियन त्यांना नडणार!

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 6 January 2021

दुखापतीतून सावरुन दोघेही लढतीसाठी सज्ज झाले आहेत. NXT न्यू इयर ईविलमध्ये ते आमने-सामने येणार आहेत. या लढतीत फिन बॅलोर (Finn Balor) कायले (Kyle O’Reilly) विरुद्ध टायटल डिफेन्ड करण्यासाठी भिडतील.

WWE चाहत्यांसाठी लवकरच धमाकेदार शो पाहायला मिळणार आहे. एका टायटलासाठी तीन जखमी वाघ एकमेंकासोबत भिडणार आहेत.  फिन बॅलोर (Finn Balor) मागील 110 दिवसांपासून NXT चॅम्पियन आहे. या कालावधीत त्याने केवळ एकदाच आपले टायटल डिफेंड केल्याचे पाहायला मिळाले. NXT TakeOver 31 मध्ये त्याची लढत कायले ओ'रायली (Kyle O’Reilly) विरुद्ध झाली होती. या लढतीवेळी दोन्ही दिग्गज स्टार्स दुखापतग्रस्त झाले होते. त्यानंतर दोघेही रिंगपासून दूर होते. फिनच्या जबड्याला फॅक्चर झाले होते. त्याने सोशल मीडियावरुन यासंदर्भातील एक फोटोही शेअर केलाय.

आता दोघेही लढतीसाठी सज्ज झाले आहेत. NXT न्यू इयर ईविलमध्ये ते आमने-सामने येणार आहेत. या लढतीत फिन बॅलोर (Finn Balor) कायले (Kyle O’Reilly) विरुद्ध टायटल डिफेन्ड करण्यासाठी भिडतील.  या दोन दिग्गजांमध्ये दमदार सामना पाहायला मिळण्याची WWE चाहत्यांना आशा आहे. या लढतीवर कॅरियन क्रॉस आणि पीट डन यांचीही नजर असेल. हे दोन्ही स्टार्स मागील काही काळापासून NXT टायटल लढतीमध्ये रिंगमध्ये उतरल्याचे पाहायला मिळाले आहे.  

कसा असेल न्यू इयर ईविल NXT चॅम्पियनशिपचा शेवट 

मागील आठवड्यात WWE NXT शोमध्ये कॅरियन क्रॉसने फिन बॅलोर आणि काइल ओ'राइली ला इशारा दिला होता. कॅरियनने मागील वर्षी NXT चॅम्पियनशिपवर कब्जा केला होता. त्याने कीथ ली याला नमवत NXT चॅम्पियनचा ताज आपल्या नावे केला होता. पण दुखापतीमुळे त्याला टायटल सोडावे लागले होते. दुखापतीमधून सावरल्यानंतर टायटलवर पुन्हा कब्जा करण्यासाठी कॅरियनची धडपड सुरु आहे. त्यामुळे NXT न्यू इयर ईविलमधील सामना संपल्यानंतर कॅरियन फिन बॅलोरवर चाल करुन येऊ शकतो. 


​ ​

संबंधित बातम्या