'धोनीला हे मान्य नव्हते म्हणून भारताचा पराभव'

वृत्तसंस्था
Monday, 15 July 2019

महेंद्रसिंह धोनीने जाणूनबुजून या स्पर्धेमध्ये भारतीय संघ हरेल असा खेळ केला. कोणत्याही इतर कर्णधाराच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वकरंडक जिंकावा हे धोनीला मान्य नव्हते. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2011 मध्ये विश्वचषक स्पर्धा जिंकली तेव्हा मोठ्या कालावधीनंतर भारताने विजेतेपद मिळवले होते.

चंदिगड : भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीला सतत लक्ष्य करणाऱ्या योगराजसिंग यांनी विश्वकरंडकातील भारताच्या पराभवाला धोनीच जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

भारताला उपांत्य सामन्यात न्यूझीलंडच्या संघाकडून 18 धावांनी पराभव स्विकारावा लागल्यानंतर भारतीय संघाचं विश्वकरंडकातील आव्हान संपुष्टात आले होते. या पराभवाबद्दल अनेकांना दोषी ठरविण्यात येत आहे. भारतीय संघात दोन गट पडल्याचीही चर्चा सुरु झाली आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू युवराजसिंगचे वडील योगराज सिंह यांनी पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीवर गंभीर आरोप केले आहेत. विश्वकरंडक स्पर्धेतील पराभवामागे धोनी जबाबदार असून, त्यानेच मुद्दाम भारताला हरवले. रवी शास्त्री आणि महेंद्रसिंह धोनीला युवराजसिंग विश्वकरंडकासाठी संघात नको होता. महेंद्रसिंह धोनीने जाणूनबुजून या स्पर्धेमध्ये भारतीय संघ हरेल असा खेळ केला. कोणत्याही इतर कर्णधाराच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वकरंडक जिंकावा हे धोनीला मान्य नव्हते. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2011 मध्ये विश्वचषक स्पर्धा जिंकली तेव्हा मोठ्या कालावधीनंतर भारताने विजेतेपद मिळवले होते. हा रेकॉर्ड आपल्या नावेच कायम रहावा यासाठी धोनीने असा वागला आहे, आपली खुर्ची टिकवण्यासाठी धोनी कोणत्याही थराला जाऊ शकतो.


​ ​

संबंधित बातम्या