World Cup 2019 : चहल देतोय आंद्रे रसेलला इशारा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 June 2019

 गोलंदाजांच्या उत्तम कामगिरीमुळेच भारताला हा विजय मिळवता आला. आता गुरूवारी (27 जुन)  वेस्टइंडीज संघाविरुद्धच्या सामन्यासाठी तयार होत असताना भारताचा लेगस्पिनर युझवेन्द्र चहल याने आंद्रे रसेल आणि संघाला इशारा दिला आहे. 

वर्ल्ड कप 2019 : आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत  भारताने शनिवारी (22 जुन) अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवुन स्पर्धेतला आपला चौथा विजय मिळविला. अफगाणिस्तानची झुंज मोडून काढताना भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा केला.  गोलंदाजांच्या उत्तम कामगिरीमुळेच भारताला हा विजय मिळवता आला. आता गुरूवारी (27 जुन)  वेस्टइंडीज संघाविरुद्धच्या सामन्यासाठी तयार होत असताना भारताचा लेगस्पिनर युझवेन्द्र चहल याने आंद्रे रसेल आणि संघाला इशारा दिला आहे. 

चहल म्हणाला, "आमच्याकडे निश्चितपणे एक योजना असेल. रसेल बिगहिटर आहे परंतु आम्ही त्याला पुरेशी गोलंदाजी केली आहे. जर रसेल चौथ्या क्रमांकावर खेळायला आला तर त्याला स्वत: ला कसे खेळण्याची गरज आहे याची पुर्ण जाणीव असेल. विश्वकरंडक स्पर्धेत चार सामने गमावल्यामुळे ते विजय मिळवण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करतील. पण तेव्हा आम्ही खेळाच्या परिस्थितीनुसार आमची रणनीती बदलू. " 

सध्या वेस्टइंडीजने आतापर्यंत खेळलेल्या सहापैकी चार सामने गमावले आहेत. त्यातच वेस्टइंडीजचा स्टार खेळाडू आंद्रे रसेल हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने ग्रस्त आहे. त्यामुळे त्याची भारताविरुद्ध  खेळण्याची शक्यताही कमी आहे.


​ ​

संबंधित बातम्या