World Cup 2019 : पावसामुळे हिच्या इतका मूड ऑफ कुणाचाच झालेला नाही..

वृत्तसंस्था
Wednesday, 10 July 2019

अशातच महेंद्रसिंह धोनीची लेक झिवाचा नाराज झालेला फोटो व्हायरल झाला आहे. पावसामुळे सामना रद्द झाला म्हणून नाराज झालेला झिवाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : भारत वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेत ज्यांच्याविरुद्ध खेळला नव्हता त्याच संघाविरुद्ध उपांत्य फेरीत गाठ पडणार म्हणजे सामना अटीतटीचा होणार यात काहीच शंका नव्हती. झालेही तसेचय भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना काबूत ठेवले. मात्र, ज्याची भीती होती तेच झाले.पावसाला सुरवात झाली. बराच वेळ सामना थांबविण्यात आला पण पाऊस काही थांबला नाही आणि अखेर सामना रद्द करावा लागला. 

आता आज राखीव दिवशी सामना पुन्हा खेळवला जाईल. किवींना उरलेली षटकं फलंदजी करण्याची संधी मिळेल तर त्यांनी दिलेल्या आव्हानाचा भारतीय संघ पाठलाग करेल. उद्याही पावसामुळे सामना रद्द झाला तर मात्र, भारतीय संघ अंतिम फेरीत प्रवेश मिळवेल. यंदाच्या विश्वकरंडकात पावसामुळे अनेक सामने रद्द झाल्याने चाहत्यांमध्ये नाराजी आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना रद्द झाल्यावर सर्वांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली. 

अशातच महेंद्रसिंह धोनीची लेक झिवाचा नाराज झालेला फोटो व्हायरल झाला आहे. पावसामुळे सामना रद्द झाला म्हणून नाराज झालेला झिवाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.


​ ​

संबंधित बातम्या